Current Affairs
ऑपरेशन कावेरी
- 25/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
सुदान मधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम सुरू केली.
सत्तेसाठी सुदानमध्ये संघर्ष
सुदामचे लष्कर प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि रॅपिड सपोर्ट ग्रुप या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे.
युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदान बाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे .
सुमारे 3000 भारतीय सुदानध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
ऑपरेशन कावेरी या मोहिमेअंतर्गत सौदी अरेबियातील जेदाह विमानतळावर भारतीय वायुदलाची दोन ‘सी- 130 जे’ विमाने तैनात ठेवण्यात आली असून नौदलाने ‘आयएनएस सुमेधा’ हे जहाज पोर्ट सुदान येथे पाठविण्यात आले आहे.
सुमारे 500 नागरिक पोर्ट सुदान येथे पोहोचले असून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारतासह अमेरिका ,फ्रान्स ,जर्मनी, हंगेरी, नेदरलँड, जपान, इटली ,जॉर्डन, इजिप्त, स्पेन, ग्रीस या देशांनीही बचाव मोहीम सुरू केले आहेत.
ऑपरेशन कावेरीचे नेतृत्व मुरलीधरण यांच्याकडे:
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांच्या देखरेखेखाली ऑपरेशन कावेरी मोहीम राबवली जात आहे
व्ही.मुरलीधरण हे केरळचे सुपुत्र आहेत
अलीकडेच भारताने राबविलेल्या काही मोहिमा:
ऑपरेशन गंगा :- रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी परतण्याकरिता राबविलेली मोहीम
ऑपरेशन दोस्त: विनाशकारी भूकंपानंतर तुर्कस्तान आणि सीरियाला मदत पुरवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ राबविले
ऑपरेशन देवीशक्ती: अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन ‘देवीशक्ती’ राबविण्यात आले.