वाढत्या महागाईमध्ये लग्न करणे सामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी ‘कन्यादान योजना’ सुरू केली आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास प्रत्येकी 20 हजार रुपयांचा निधी विभागामार्फत देण्यात येणार आहे.त्यासाठी 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत.
या योजनेमध्ये वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या नावाने 20 हजार रुपयांचा धनादेश विवाहाच्या दिवशी दिला जातो. यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची अट ठेवण्यात आली आहे.
कन्यादान योजनेसाठी या विभागाने अलीकडेच 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
याशिवाय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे चार हजार रुपये दिले जातील.
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे.