कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच आश्वासनांपैकी शक्ती योजना तेथील काँग्रेस सरकारने लागू(11 जून) केली आहे .
त्यामुळे महिलांना बसमधून मोफत प्रवासाची सेवा उपलब्ध झाली आहे .
या योजनेमुळे कर्नाटक राज्यातील 41 लाख 8 हजार महिलांना मोफत प्रवास करता येईल.
शक्ती योजनेच्या बोधचिन्हाच्या अनावरणानंतर पाच महिलांना प्रातिनिधिकरित्या ‘शक्ती स्मार्ट कार्ड’ देण्यात आले.
नोंदणीआवश्यक:
या मोफत बस सेवेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी संकेतस्थळ ‘सेवा सिंधू’ वर नोंदणी करून शक्ती स्मार्ट कार्ड साठी अर्ज करू शकतात.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात या योजनेची सुरुवात करतील.
Δ