राजस्थान विधानसभेत किमान उत्पन्न हमी विधेयक -2023 आवाजी मतदानाने मंजूर झाले.
असे विधेयक आणणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
यानुसार राजस्थानातील ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांसाठी वर्षातील 125 दिवसांचा रोजगार हा कायदेशीर अधिकार ठरणार आहे.
विधेयकात सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पतीचे निधन झालेल्या महिला ,एकल महिला यांना महिना किमान 1000 रुपये पेन्शन मिळण्याचे प्रस्तावित आहे.