दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण व दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या केनियाच्याफेथ किपयेगॉनने महिलांच्या पंधराशेमीटर शर्यतीत नवीन विश्वविक्रमाची नोंद करताना इतिहास घडविला .
फ्लोरेन्स येथील डायमंड लिगमध्ये ही शर्यत 3 मिनिटे 49. 11 सेकंदात जिंकताना तिने इथिओपियाच्या गेंझेबे दिबाबाच्या नावावर 2015 पासून असलेला 3 मिनिटे 50.07 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला.
या विश्वविक्रमामुळे 3 मिनिटे 50 सेकंदाच्या आत धावणारी ती पहिली महिला धावपटू ठरली.