जपान दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान मधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केली.
या विद्यापीठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल ही मानद डॉक्टर जाहीर करण्यात आली.
कोयाचो येथील महापौर योशीया हिरानो हे आगामी मुंबई दौऱ्यात फडणवीस यांना ही पदवी प्रदान करणार आहे.