Current Affairs
खेलो इंडिया योजनेअंतर्गत स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके
- 21/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली.
रुजुला भोसले हिने 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तर साक्षी बोऱ्हाडे हिने 800 आणि 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली .
भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबई केंद्राने महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून मिळून एकंदर 85 ऍथलेट सहभागी झाले होते .
100 मीटर , 200 मीटर , 400 मीटर ,800 मीटर आणि 1500 ते 5000 मीटर धावण्याबरोबरच लांब उडी , तिहेरी उडी , गोळा फेक , थाळी फेक , भालाफेक अशा विविध 14 प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता .
अन्य क्रीडा प्रकारातील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रिषिका शेट्टी हिने तर 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयालक्ष्मी कटारे हिने सुवर्ण पदक पटकावले .
लांब उडी क्रीडा प्रकारात शिल्पा जवाराजन , गोळाफेक मध्ये अमृता कटके , थाळीफेक स्पर्धेत अमीरा शाह आणि भालाफेक स्पर्धेत ईश्वरी धंगेकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली .
महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड हे आहेत.