गुजरात मधील गांधीनगर या ठिकाणी 17 ऑगस्ट पासून पारंपारिक औषधांबाबतची जागतिक परिषद भरणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयातर्फे हा अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे.
महात्मा मंदिर केंद्रात ही परिषद होईल.
या उपक्रमातून तज्ञांना आरोग्यासाठी वरदान ठरतील अशा विज्ञानातील अत्याधुनिक सुविधांची माहिती होईल .
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधोनम घेब्रायसेस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.
Δ