Current Affairs
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार
- 19/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
केंद्र सरकारतर्फे गांधी शांतता पुरस्कार उत्तर प्रदेशातील गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झाला.
अहिंसेच्या मार्गाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपुर या संस्थेला 2021 या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार घोषित करण्यात आला
गीता प्रेस:
स्थापना: 1923
जगातील सर्वांत मोठे प्रकाशक म्हणून ही संस्था ओळखली जाते.
या संस्थेने 14 भाषांतील 41 कोटी 70 लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या 16 कोटी 21 लाख प्रतींचा समावेश आहे.
यापूर्वी ओमानचे सुलतान कबूस बिन सैद यांना 2019 मध्ये तर वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांना मरणोत्तर 2020 मध्ये गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.
गांधी शांतता पुरस्कार:-
अहिंसा आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी योगदान यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो
सुरवात:- 1995
गांधींनी चालवलेल्या आदर्शांना श्रद्धांजली म्हणून, भारत सरकारने मोहनदास गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार सुरू केला.
अहिंसा आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात योगदान दिल्याबद्दल व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा हा वार्षिक पुरस्कार आहे.
पुरस्कारामध्ये स्वरूप :– एक कोटी रुपये , मानपत्र आणि हस्तकलेपासून तयार केलेली वस्तू
भारताचे पंतप्रधान , लोकसभेतील विरोधी पक्षनेते , भारताचे सरन्यायाधीश , लोकसभेचे अध्यक्ष आणि अन्य एक प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असलेली ज्युरी दरवर्षी पुरस्कारार्थी ठरवते.