Current Affairs
गेल (GAIL)इंडियाच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची नियुक्ती
- 19/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या(GAIL- गेल) संचालकपदी (मार्केटिंग) संजय कुमार यांनी नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी संजय कुमार हे दिल्ली परिसराला गॅसपूरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक होते.
संजय कुमार हे आयआयटी खरगपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर आणि एमबीए असून त्यांना नैसर्गिक वायू क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव आहे.
1988 या वर्षी ते ‘गेल’ मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंग, व्यापार, जहाज वाहतूक इत्यादी कामे पाहिली आहेत.
‘गेल’ इंडिया:
GAIL (इंडिया) लिमिटेड (पूर्वीचे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लि. म्हणून ओळखले जात असे ) हे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीचे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे .
यामध्ये खालील व्यवसाय विभाग आहेत: नैसर्गिक वायू , द्रव हायड्रोकार्बन, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस ट्रांसमिशन, पेट्रोकेमिकल , शहर वायू वितरण, सौर आणि पवनासह अक्षय ऊर्जा , अन्वेषण आणि उत्पादन, पेट्रोकेमिकल्स, गेल आणि वीज निर्मिती .