Current Affairs
गोपाळ कृष्ण गोखले
- 09/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जन्म : 9 मे 1866, कोतळूक, जि. रत्नागिरी
गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते.
1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.
या काळातील मवाळमतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली.
महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले.
गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता.
राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता.
गोखले यांचे कार्य:
लोकमान्य टिळक आणि गोखले यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्य टिळक यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला.
गोखले यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले.
तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
1896 यावर्षी वेलबी कमिशन समोर साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दलची माहिती दिली .
1899 मध्ये मुंबई कायदेमंडळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली
1902 या वर्षी व्हाइसरॉय इम्पेरियल कौन्सिल मध्ये नियुक्ती
1905 या वर्षी पुणे या ठिकाणी भारत सेवक समाजाची स्थापना केली
1905 यावर्षीच गोखले यांनी ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांप्रमाणे भारतालाही वसाहतींचे स्वराज्य देण्यात यावे अशी मागणी केली होती
‘ द डायमंड ऑफ इंडिया अँड ज्वेल ऑफ महाराष्ट्र ‘या शब्दात लोकमान्य टिळकांनी गोपाळ कृष्ण गोखले यांचा गौरव केला होता.
निधन: 19 फेब्रुवारी 1915, मुंबई