Current Affairs
चंद्रयान-3 आज अवकाशात झेपावणार | Chandrayaan-3 will launch into space today
- 14/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अत्यंत महत्त्वकांक्षी चंद्रयान 3 चे आज 2 वाजून 35 मिनिटांनी एलव्हीएम 3-एम4 या प्रक्षेपण यानाचे मदतीने चंद्रयानचे उड्डाण होईल.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
2019 साली चंद्रयान 2 मोहिमेमध्ये विक्रम या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न इस्रो ने केला होता.
या लँडर सोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा रोव्हरही धडकण्यात आला होता मात्र लँडर चंद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अंशतः यशस्वी ठरली.
आता चंद्रयान 3 मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे.
वैज्ञानिकांमध्ये फॅट बॉय म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम -3 हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तुमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे.
आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपण यानाची चंद्रयान -3 ही चौथी मोहीम आहे.
मोहिमेचे तीन मुख्य टप्पे:
1)यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावने
2) चंद्रपृष्ठावर अलगद अवतरण
3) लॅन्डर मधून रोव्हरची चंद्रपृष्ठावर सफर