Current Affairs
चंद्रावर गंधक आणि ऑक्सिजन असल्याचा शोध | Discovery of sulfur and oxygen on the moon
- 30/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागात गंधक असल्याची नोंद चंद्रयान- 3 यानाच्या प्रज्ञान रोव्हरवरील लेझर उपकरणाने केली आहे.
● चंद्रभूमीच्या मूळ अवस्थेतील पहिल्याच मोजणीत हे स्पष्ट झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जाहीर केले.
● या उपकरणाला अपेक्षेनुसार ॲल्युमिनियम कॅल्शियम , टिटॅनियम, मॅग्नीज सिलिकॉन आणि ऑक्सिजनही आढळून आला आहे.
● आता त्या ठिकाणी हायड्रोजन आहे का याचा शोध सुरू आहे.
शक्तिशाली लेझरच्या माऱ्यातून मूलद्रव्यांचा शोध:
● भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या बेंगळुरू येथील लॅबरोटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टिम्स या प्रयोगशाळेने ‘लिब्स’ या एक किलो वजनाच्या उपकरणाची निर्मिती केली आहे.
● ‘ लिब्स’च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर जवळून शक्तिशाली लेझरचा मारा केला जातो.
● लेझरचा मारा होणाऱ्या ठिकाणी तापमान वाढवून तेथे प्लाझ्मा तयार होतो. या प्लाझ्माकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट तपासून त्याद्वारे तिथे कोणती मूलद्रव्य आहेत हे समजू शकते.