जगद्विख्यात आणि अनेक विजेतेपद तसेच पुरस्कार प्राप्त मराठमोळा शरीरसौष्ठपट्टू आशिष साखरकर यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले.
परळ विभागातून कारकीर्द घडवणाऱ्या आशिषने शरीरसौष्ठविश्व व्यापले होते.
चार वेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप असे अनेक विजेतेपद मिळवले.
आशिष शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी देखील ठरले होते.