Current Affairs
जगनमोहन रेड्डी भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री
- 14/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म'(एडीआर) ने भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे भारतातून सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. जगनमोहन रेड्डी यांची एकूण 510 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15 लाखांची आहे.
‘एडीआर’ ने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेले स्वतःची मतदान प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांबाबत निष्कर्ष काढले आहे.
देशातील सर्वात श्रीमंत पहिले तीन मुख्यमंत्री
जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) – 510 कोटी रुपये
पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश) – 163 कोटी रुपये
नवीन पटनायक(ओडिशा) – 63 कोटी रुपये
सर्वात कमी संपत्ती असलेले पहिले तीन मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) – 15 लाख रुपये
पिनराई विजयन( केरळ) – 1 कोटी रुपये
मनोहरलाल खट्टर (हरियाणा)- 1 कोटी रुपये
अहवालातील प्रमुख नोंदी
28 राज्ये आणि दिल्ली , पदुच्चेरी हे दोन केंद्रशासित प्रदेशांना मुख्यमंत्री आहेत.
जम्मू-काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशाला अद्याप मुख्यमंत्री नाही.
एकूण 30 मुख्यमंत्र्यांच्या विश्लेषणात 29(97%) मुख्यमंत्री कोट्याधीश.
प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता 33.96 कोटी.
30 पैकी 13 (43%) मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती.
एडीआर (असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म)
स्थापना : 1999
मुख्यालय : नवी दिल्ली