Current Affairs
जनऔषधी योजनेत नवीन उत्पादने आणि न्यूट्रास्युटिकल्सचा समावेश |Inclusion of new products and nutraceuticals in Janaushadhi scheme
- 28/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालयाने (PMBI), आपल्या यादीत डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड ( सावकाश पाझरणारे) 1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे तसेच जन औषधी प्रोटीन (उच्च प्रथिने) पावडर, महिलांसाठी जन औषधी प्रोटीन पावडर (व्हे प्रोटीन पावडर) यासारख्या नव्या उत्पादनांचा समावेश केला आहे.
सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 10,000 जन औषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरात 30 जून 2023 पर्यंत एकूण 9512 जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) च्या उत्पादन यादीमध्ये 1800 औषधे, 285 शस्त्रक्रिया उपकरणे आणि इतर उपभोग्य वस्तूंचा समावेश आहे.
ही उत्पादने जन औषधी केंद्रात बाजाराच्या तुलनेत 50 % – 90 % सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
मधुमेह आणि महिलांच्या आरोग्याची वाढती समस्या लक्षात घेऊन, जनऔषधी योजनेने आपल्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये खाली नमूद केलेल्या उत्पादनांचा प्रारंभ करून यादीत भर घालण्याचा निर्णय घेतला आहे.
ही उत्पादने सामान्य जनतेसाठी आधीपासूनच देशभरातील निवडक जन औषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.