भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात आयोजित केलेल्या जपान – भारत सागरी युद्धसराव 2023(जिमेक्स 23) या सातव्या युद्धसरावाचा 11 जुलै दोन्ही बाजूंकडून पारंपरिक स्टीमपास्टने एकमेकांना निरोप देत समारोप झाला.
भारतीय नौदलाची दिल्ली, कमोर्ता आणि शक्ती ही जहाजे , ईस्टर्न फ्लीटचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल गुरुचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि जपान सागरी स्वसंरक्षण दलाचे (JMSDF) सॅमिदारे हे जहाज रिअर ऍडमिरल निशियामा तकाहिरो, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला वन यांच्या नेतृत्वाखाली या सहा दिवसांच्या युद्धसरावात सहभागी झाले होते.
जिमेक्स – 23 अंतर्गत दोन्ही नौदलांनी संयुक्तपणे अतिशय गुंतागुंतीचे सराव केले.