Current Affairs
जागतिक आंत्रेप्रिन्यूअरशिप मॉनिटर अहवाल (2022- 2023)
- 11/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात देशातील महिलांना आघाडी घेतली आहे. याबाबतीत आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थामध्ये अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे.
चीनच्या तुलनेत गेल्या साडेतीन वर्षांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांची संख्या देशात दुपटीहून अधिक आहे
नवउद्यमी महिलांच्या हिस्सेदारीतही भारताने (11%) चीनला (5%) मागे टाकले आहे.
याबाबतीत अमेरिका 18% सह अग्रस्थानी आहे.भारताने जर्मनी (7%) आणि जपानलाही (3.6%) मागे टाकले आहे.
जागतिक आंत्रेप्रिन्यूअरशिप मॉनिटर 2022- 2023 चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला त्यातून ही आकडेवारी समोर आली.
नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम देश असलेल्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, तैवान या देशानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो.
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार.
देशातील एकूण 5.85 कोटी उद्योजकांपैकी 80 लाख महिला असून त्यांचा हिस्सा 14% आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये 2.2 ते 2.7 कोटी लोक काम करतात.
देशातील लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 20% उद्योग महिलांच्या मालकीचे असून सुमारे 23% लोक या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.
नव्या व्यवसायांच्या कल्पना सुचवणाऱ्यांमध्ये महिलांचा वाटा 40% आहे .
देशात महिलांनी सुरू केलेल्या नव्या तीन कोटीहून अधिक उद्योगाद्वारे 2030 पर्यंत, दीड ते 17 कोटी रोजगार निर्माण होण्याच्या अपेक्षा आहे.
सध्या देशाच्या जीडीपी मध्ये महिलांचा वाटा 22 % आहे तर जागतिक सरासरी 45 % आहे.
अहवालातील ठळक वैशिष्ट्ये:
भारतीय नवउद्योजकांमध्ये तज्ञ महिलांचा वाटा 11%
देशातील एकूण 5.85 कोटी उद्योजकांपैकी 80 लाख महिला
लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 20% उद्योग महिलांच्या मालकीचे
उद्योगांमधून वर्ष 2030 पर्यंत, दीड ते सतरा कोटी रोजगार निर्मितीची अपेक्षा
महिलांच्या स्टार्ट-अप मध्ये वाढती गुंतवणूक
गुंतवणूकीवर परतावा देण्यात महिलांच्या कंपन्या आघाडीवर
जागतिक आंत्रेप्रिन्यूअरशिप मॉनिटर :
(Global Entrepreneurship Monitor – GEM)
हा एकमेव जागतिक संशोधन स्त्रोत आहे जो वैयक्तिक उद्योजकांकडून थेट उद्योजकतेवर डेटा संकलित करतो.
व्यवसाय सुरू करण्याच्या आणि व्यवस्थापित करण्याच्या संदर्भात व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करतो.
जेईएम प्रामुख्याने अनेक व्यवसायिक टप्प्यांमध्ये उद्योजकतेच्या दरांचा मागोवा घेते आणि उद्योजकांची वैशिष्ट्ये प्रेरणा आणि महत्त्वकांक्षा तसेच सामाजिक मनोवृत्तीचे मूल्यांकन करते.