Current Affairs
जागतिक तिरंदाजी स्पर्धा (स्टेज थ्री) मध्ये महाराष्ट्राच्या अदितीचा विश्वविक्रम (Maharashtra’s Aditi’s World Record in World Archery Competition (Stage Three)
- 16/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
महाराष्ट्रातील सातारा येथील शेरेवाडे येथे वास्तव्य करणाऱ्या सोळा(16) वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (स्टेज थ्री) विश्वविक्रमाची नोंद केली.
अदीतिने कोलंबियांमधील मेडलीन येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील महिला कंपाऊंड पात्रता फेरीत 18 वर्षाखालील विक्रम मोडीत काढला.
अदितीने अमेरिकेच्या लिको अरीओला हिचा विक्रम मागे टाकत भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली.
अदितीने पात्रता फेरीच्या लढतीत 720 पैकी 711 गुणांची कमाई केली.अमेरिकेच्या लिको हिने 720 पैकी 705 गुणांची कमाई करीत विक्रम प्रस्थापित केला होता
अदिती स्वामी ही मूळची साताऱ्याची. इयत्ता सहावी पासून तिने तिरंदाजी खेळाकडे आपली पावले वळवली. आता ती बारावीचे शिक्षण घेत असून सायन्स मधून पुढील शिक्षण पूर्ण करीत आहे.
दृष्टी तिरंदाजी अकादमीत या खेळाचा सराव केला.
प्रवीण सावंत या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अदितीने तिरंदाजीचे कसब आत्मसात केले.
16 वर्षीय अदितीने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या एशिया कप लेग- 3 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.