Current Affairs
‘जागतिक दृष्टी दिन’ | ‘World Sight Day’
- 12/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, हा एक जागतिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम आहे. त्यामागे अंधत्व आणि दृष्टि दोषाकडे लोकांचे लक्ष वेधणं, असा उद्देश आहे.
2000 मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या साइट फर्स्ट मोहिमेद्वारे हा दिवस सुरू करण्यात आला होता.
यावर्षी (2023)12 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक दृष्टी दिन’ साजरा केला जात आहे.
लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, वेगवेगळे नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.
सन 2000 मध्ये पहिल्यांदा ‘जागतिक दृष्टी दिवस’ साजरा करण्यात आला.
2023 ची थीम :-
यावर्षी ‘जागतिक दृष्टी दिना’ची थीम आहे, “तुमच्या डोळ्यांवर प्रेम करा’, कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या आरोग्याकडं लक्ष द्या.” ही थीम आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरुकता करण्यासाठी आणि आपल्या दृष्टीची काळजी घेण्याच्या गरजेवर भर देते.