प्रतिष्ठेच्या जागतिक परिचारिका पुरस्कारासाठी दोन भारतीय परिचारिकांच्या नावांना नामांकनाच्या अंतिम यादीत स्थान मिळाले आहे .
दुबईमधील एस्टर डीएम हेल्थकेअर या कंपनीतर्फे अडीच लाख डॉलरचा हा पुरस्कार दिला जातो.
शांती तेरेसा लाक्रा आणि जिन्सी जेरी असे या भारतीय परिचारिकांची नावे आहेत.
शांती या अंदमान निकोबार बेटावर आदिवासी गटांमध्ये काम करतात. आदिवासी गटांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आरोग्याविषयी गरज पूर्ण करण्यासाठी शांती यांनी अनेक वर्ष तेथे वास्तव केले आहे.
त्यांच्या कामाबद्दल त्यांना पद्मश्री या पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे
केरळमधील जन्मलेल्या आणि सध्या आयर्लंड मध्ये वास्तव्यास असलेल्या जिन्सी या संसर्ग रोखण्यासाठी काम करतात.