Current Affairs
जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 161 व्या स्थानावर
- 04/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 11 क्रमांकाने घसरन झाली आहे.
जगातील 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 161 इतक्या तळाला गेला आहे तर शेजारी देश पाकिस्तानात प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वतंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्यांचे स्थान 7 अंकांनी वर गेले आहे.
पाकिस्तान या यादीमध्ये 150 व्या क्रमांकावर आहे.
जगभरातील प्रसारमाध्यमावर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स(आरएसएफ) या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे
नॉर्वे, आयर्लंड आणि डेन्मार्क हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत तर व्हिएतनाम, चीन आणि उत्तर कोरिया हे सर्वात तळाला आहेत .
भारत या यादीत मागच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या यादीमध्ये 150 व्या क्रमांकावर होता
माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक पहिले दहा देश:
1) नॉर्वे
2)आयर्लंड
3)डेन्मार्क
4)स्वीडन
5)फिनलंड
6)नेदरलँड
7)लिथुआनिया
8)इस्टोनिया
9)पोर्तुगाल
10)ईस्ट तिमोर
रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स (RWB):-
ही एक आंतरराष्ट्रीय ना – नफा आणि गैर – सरकारी संस्था आहे ज्याचा उद्देश माहितीच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करणे हा आहे.
स्थापना :- 1985
संस्थापक :- रॉबर्ट मेनार्ड, रेमी लॉरी , जॅक मोलेनाट, एमिलियन ज्यूबिनो
मुख्यालय :- पॅरिस (फ्रान्स)