दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे.
परिषदेची संकल्पना :
“समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास”
उद्देश :
बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व आणि विद्वान यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याच्या आणि एकत्रितपणे त्यावर तोडगे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.