डिजिटल परिवर्तन आणि परिसंस्थेला सक्षम करणे आणि सीमापार सहकार्य यावर लक्ष केंद्रित करताना तरुणांमध्ये समावेशक उद्योजकता आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना देण्यासाठी जागृती जी 20 स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले.
भाताच्या जी – 20 अध्यक्ष पदाच्या घोषणेच्या मुख्य तत्वासह ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे तर शेवट 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत होत आहे.
या उद्योजकता रेल्वे गाडीच्या प्रवासात देशातील बँकिंग अग्रणी स्टेट बँकेनेही सहभाग केला आहे.
या यात्रेची यावर्षीचे 16 वे वर्ष असून त्याची सुरुवात शशांक मनी यांनी 2008 यावर्षी केली होती.
मुंबईतील समारोपाआधी दरम्यानच्या काळात मुंबई, बेंगळूरु, वाराणसी ,देवरिया, दिल्ली आणि गांधीनगर येथे सात मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहेत.