आपण नवीन संसदेत जात असताना जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठा कमी होता कामा नये. ‘जुने संसद भवन’ म्हणण्याऐवजी ‘संविधान सदन’ म्हणून ओळखले जावे अशी विनंती आणि सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
घटनेची प्रत देऊन स्वागत:
जुन्या संसदेतील प्रवेशद्वार क्र. 5 मधून निघालेले पंतप्रधान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच विरोधी खासदारांनी मकरद्वारातून नवीन संसदेत प्रवेश केला.
प्रत्येक खासदाराचे एक किट(पिशवी) देऊन स्वागत केले. त्यात राज्यघटनेची प्रत, त्याची पॉकेट कॉपी, 75 रुपयांचे विशेष नाणे, नवीन संसदेबद्दलची माहिती, जुन्या संसदेचा इतिहास इत्यादी माहिती होती.