Current Affairs
ज्येष्ठ गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर यांचे निधन | The great mathematician Dr. Mangala Narlikar controlled
- 18/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यामध्ये हातखंड असलेल्या ज्येष्ठ गणितज्ञ आणि लेखिका डॉक्टर मंगला जयंत नारळीकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या.
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या गणित विद्यालयात आणि सहाय्यक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून डॉक्टर मंगला नारळीकर यांनी काम केले होते.
अल्प परिचय:
डॉक्टर मंगला नारळीकर यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला होता.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1962 मध्ये बी.ए.ची पदवी मिळवली.
1964 मध्ये गणित विषयात घेऊन एम. ए .ची पदवी संपादन करीत त्या विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या.
त्यावेळी त्यांना कुलपतींच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते
1967 ते 1969 या कालावधीत केंब्रिज विद्यापीठ ,मुंबई विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी गणिताचे अध्यापन केले.
टाटा इन्स्टिट्यूट येथे संशोधन करून त्यांनी 1981 मध्ये प्राध्यापक के .रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संश्लेषणात्मक अंक सिद्धांत’ या विषयात पीएचडी संपादन केली.
संश्लेषणात्मक भूमिती, अंक सिद्धांत, प्रगत बीजगणित आणि संस्थितीशास्त्र हे डॉक्टर मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय होते.
त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
डॉक्टर मंगला नारळीकर यांच्या ग्रंथसंपदा:
1) एन एसे एक्सेस टू बेसिक मॅथेमॅटिक्स
2) गणितगप्पा
3)गणिताच्या सोप्या वाटा
4)पाहिलेले देश, भेटलेली माणसं
5) फन अँड फंडामेंटल ऑफ मॅथेमॅटिक्स