Current Affairs
‘डीआरडीओ’त कुरुलकर यांच्या जागी डॉक्टर मकरंद जोशी यांची निवड (Doctor Makarand Joshi selected for Kurulkar in DRDO)
- 02/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
दिघी येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेच्या संचालकपदी डॉक्टर मकरंद जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
डॉक्टर कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असून याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे. त्यानंतर संचालक पदाची जागा अद्याप रिक्त होती. डॉक्टर जोशी संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.
डॉक्टर जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे.
ते ऑगस्ट 2000 मध्ये आर अँड डीई(अभियंता) प्रयोगशाळेत रुजू झाले .
आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे .
आर अँड डिई ची स्थापना सहा दशकांपूर्वी करण्यात आली असून ही एक प्रमुख अभियांत्रिकी प्रयोगशाळा आहे. याद्वारे भारतीय सशस्त्र दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींच्या स्वदेशी विकासावर भर देण्यात येत आहे.
या प्रयोगशाळेद्वारे लष्करासाठी लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्रिजिंग सिस्टीम, विस्फोटक प्रणाली, लॉन्चर्स आणि ग्राउंड सपोर्ट सिस्टीम यांचा समावेश आहे .
संमिश्र उत्पादने, रोबोटिक प्रणाली आणि मायक्रो -इलेक्ट्रो -मेकॅनिकल- सिस्टीम विकसित करण्याच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा अग्रणी आहे.