दोन वेळा ‘आयर्नमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉनचा’ चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत हिप्परगी यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’ साठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव स्पर्धक आहेत.
ब्राझीलमध्ये 20 ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.
‘ डेका ट्रायथलॉन’ चा किता पटकावण्यासाठी त्यांना दहा दिवसांत 38 किलोमीटर पोहणे, 422 किलोमीटर धावणे आणि 800 किलोमीटर सायकलिंग करायचे आहे.