Current Affairs
डॉ अभय बंग, डॉ. राणी बंग यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार – 2023 (Dr. Abhay Bang, Dr. ‘Rajarshi Shahu’ Award to Rani Bang – 2023)
- 15/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार जेष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग दांपत्याला जाहीर झाला.
एक लाख रुपये रोख ,स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
या उभयंतांनी ग्रामीण आरोग्य ,बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांमध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार जयंतीदिनी 26 जून रोजी दिला जातो.
याआधी व्ही. शांताराम ,कुसुमाग्रज, एनडी पाटील, शरद पवार ,डॉक्टर रघुनाथ माशेलकर , आशा भोसले, गणपतराव आंधळकर, अण्णा हजारे, तात्याराव लहाने इत्यादींना हा पुरस्कार देण्यात आला आहे .
डॉक्टर बंग यांना वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठात व भारतात प्रथम स्थान, चार सुवर्णपदके तसेच डि.लीट उपाधीने गौरविण्यात आले आहेत.
त्यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’, ‘कोवळी पानगळ’,’ सेवाग्राम ते शोधग्राम’, साहित्य प्रसिद्ध आहेत.
तसेच डॉक्टर राणी बंग यांची ‘गोईन’,’ कानोसा’ इत्यादी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे.