प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना भारतीय अभियांत्रिकी परिषदेचा इंजिनिअरिंग कौन्सिल ऑफ इंडिया उद्योग श्रेणीतील प्रख्यात अभियंता पुरस्काराने (एमिनेन्ट इंजिनिअर अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे डॉ. चौधरी यांना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय अभियांत्रिकी परिषद ही अभियांत्रिकी व्यवसायाची सर्वोच्च संस्था आहे.