Current Affairs
दलाई लामा यांना 64 वर्षानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान
- 28/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना त्यांच्या निवासस्थानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला
धर्मशाळा येथील त्यांच्या निवासस्थानी 64 वर्षानंतर रॅमन मॅगसेसे फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला
1959 मध्ये फिलिपाईन्स मधील रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनद्वारे पवित्र धर्माच्या रक्षणासाठी तिबेटी समाजाच्या संघर्षासाठी देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
या पुरस्काराला आशियातील प्रतिनोबेल म्हणून ओळखले जाते
फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या लोकसेवात्मक कार्याच्या स्मरणार्थ या पुरस्कारांची स्थापना 1957 या वर्षी करण्यात आली
आशियातील समाज उपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते
दरवर्षीय हे पुरस्कार रॅमन मॅगसेसे यांच्या जन्मदिनी 31 ऑगस्ट रोजी प्रदान केले जातात
हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती आचार्य विनोबा भावे (1958)