केंद्र सरकारच्या धोरणाच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे
यानुसार राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण असणार आहे
केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याच धर्तीवर राज्यातही हे आरक्षण लागू करण्यात येणार आहे