Current Affairs
देशातील पहिला ‘डिफेन्स फंड’ सुरू
- 17/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला ‘डिफेन्स फंड’ सुरू झाला.
‘एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ ने (एचडीएफसी एएमसी) या फंडाची सुरुवात केली आहे.
या फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर त्यांचे पैसे ‘एचडीएफसी एएमसी’ संरक्षण क्षेत्रात गुंतवणार आहे.
‘ एचडीएफसी डिफेन्स फंड ‘असे या फंडाचे नाव असून त्याची न्यू फंड ऑफर 19 तारखेला खुली होत आहे.
ही न्यू फंड ऑफर 2 जून पर्यंत सुरू राहील.
या फंडात आलेल्या गुंतवणुकीपैकी 80% रक्कम संरक्षण आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवली जाणार आहे.
एअरोस्पेस, डिफेन्स, एक्स्प्लोझिव्ह ,शिपबिल्डिंग आणि अन्य संरक्षण पूरक सेवा अशा क्षेत्रातून हे पैसे गुंतवले जातील.
वरील सर्व क्षेत्रातील कंपन्या निवडताना ‘एचडीएफसी एएमसी’ काही निकष ठरवणार आहे.
उत्तम गुणवत्ता व्यवस्थापन असणारी, व्यवसायाचा इतिहास चांगला असलेली आणि भावी काळात विविधअंगी विकासास प्राधान्य देणारी अशी कंपनी निवडली जाणार आहे.