Current Affairs
देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण
- 26/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केरळमधील कोचीयेथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले.
● वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडेल.
पहिल्या वॉटर मेट्रोचे वैशिष्ट्ये:
● या प्रकल्पाचा पहिला टप्पा 8 बोटींनी सुरू करण्यात आला आहे.
● पहिला टप्पा: वायपन टर्मिनल ते विट्टीला टर्मिनल
● या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी रुपये आहे.
● कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटींची निर्मिती केली आहे.
● केरळ सरकार आणि जर्मनीची केएफडब्ल्यू यांचे एकत्ररित्या फंडिंग
पूर्णपणे वातानुकूलित
● बोट मेट्रो लिथियम टायटॅनेट ऑक्साईड (LTO) बॅटरीद्वारे समर्थित आहे. बॅटरीची क्षमता 122 kWh आहे. बॅटरी तंत्रज्ञान नवीन असून बोट 10 ते 15 मिनिटांत चार्ज होऊ शकते.
● निवडक ठिकाणी तरंगत्या जेटीवर सुपर-चार्जर बसवण्यात आले आहेत. बोटीला जनरेटर बॅक-अप देखील आहे. या बोटी पूर्णपणे वातानुकूलित आहेत. त्याच्या मोठ्या खिडक्या प्रवाशांना बाहेरील जगाच्या दृश्यांचा आनंद घेऊ देतात.
● मेट्रो प्रवाश्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी अंतर्गत रचना देखील करण्यात आली आहे. या बोटीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जास्त वेगातही कमी लाटा निर्माण होतात.
15 मार्गांवर धावण्याची योजना
● एकूण 15 मार्गांवर वॉटर मेट्रो चालवण्याचा प्रकल्प आहे, ज्याची एकूण लांबी 76 किमी असेल. यासाठी 78 बोटींचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वॉटर बोटमध्ये सुपरफास्ट चार्जर बसवण्यात आले असून त्याच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्सही तयार करण्यात आली आहेत. ही बोट चार्ज होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतील आणि त्यानंतर ती पुन्हा प्रवासाला निघेल.
मुख्य बाजारपेठेत पोहचण्यास होणार अधिक सोपे
● संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 78 जलद, इलेक्ट्रिकली प्रोपेल्ड हायब्रीड बोटी सुरू केल्या जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून कोची तलावाच्या काठावर राहणाऱ्या कुटुंबांना मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. एक लाखाहून अधिक लोकांना वॉटर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
केरळ मधील पहिल्या वंदे भारतचेही लोकार्पण
● केरळची पहिली वंदे भारत ही उत्तर केरळला दक्षिण केरळशी जोडेल
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान राज्यातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
● ही ट्रेन 11 जिल्ह्यांमध्ये धावणार आहे. यामध्ये तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड यांचा समावेश आहे.