भारतात 2021- 22 या वर्षात 75,394 कुष्ठ रुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील 17,014 रुग्ण आहेत
त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश ,छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यांच्या क्रमांक आहे
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रि या जिवाणूमुळे होणारा आजार आहे
कुष्ठरोगाचे जिवाणू प्रामुख्याने हात पायांच्या शिरा आणि त्वचेवर विपरीत परिणाम करतात
कुष्ठरोगामुळे बाधित भागावर जखमा होतात
अशी आहेत लक्षणे:
त्वचेवर पांढरपट किंवा लालसर चमकदार चट्टे येणे
मांसपेशी दुर्बल व कमकुवत होणे
हात पाय सुन्न पडणे ,बधीर होणे
बोटे वेडी वाकडी होणे
बाधित भागाच्या संवेदना कमी होणे
राज्यनिहाय कुष्ठरोगांची संख्या
1) महाराष्ट्र – 17,014
2)बिहार – 11,318
3)उत्तर प्रदेश – 10,312
4)छत्तीसगड – 7,422
5) मध्य प्रदेश – 7,313
Δ