Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > दोन दशकानंतर सांख्यिकी आयोगावर भारताची निवड
दोन दशकानंतर सांख्यिकी आयोगावर भारताची निवड
- 07/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे .
- मतदानात भारताला 53 पैकी 46 मते मिळाली .
- या आयोगावर काम करण्याचे भारताला दोन दशकानंतर संधी मिळाली आहे.
- याआधी भारत हा 2004 मध्ये सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य होता
- संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने सांख्यिकी आयोगावर भारताची निवड केली.
- आशिया – प्रशांत गटात दक्षिण कोरियाने चीनला पराभूत करत आयोगात स्थान मिळवले.
- आशियाई- प्रशांत गटातील दोन जागांसाठी भारतासह दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती आणि चीन स्पर्धेत होते.
- पहिल्या टप्प्यातील मतदानात दक्षिण कोरियाला 23 ,चीनला 19 आणि युएईला 15 मते मिळाली.
- दुसऱ्या टप्प्यात दक्षिण कोरिया आणि चीनला समान 25 मते मिळाली .
- निवडणुकीच्या नियमानुसार दक्षिण कोरियाला विजयी ठरविण्यात आले.
संयुक्त राष्ट्राचा सांख्यिकी आयोग
- युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशन हे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा कार्यात्मक आयोग आहे.
- सांख्यिकी आयोग संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी विभागाच्या कामावर देखरेख करतो.
- सांख्यिकी आयोग ही जागतिक सांख्यिकी प्रणालीची सर्वोच्च संस्था आहे जी जगभरातील सदस्य राष्ट्रातील मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञांना एकत्र आणते.
स्थापना : 1947
मुख्यालय : न्यूयॉर्क
अध्यक्ष : शिगेरूरू कवासकी (जपान)
सदस्य संख्या : 24