Current Affairs
नवीन संसद भवनचे उदघाटन
- 29/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली. यानंतर नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. नवी संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल ८६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
नव्या संसद भवनातील राजदंडाचे महत्त्व:
सातव्या शतकात एका तमिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.
अफाट साम्राज्यविस्तार करणाऱ्या चोल राजघराण्यात सत्तेचे हस्तांतरण या राजदंडाद्वारेच केले जायचे.
इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं. त्यावर नेहरुंनी सी .राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती.
त्यानुसार हा राजदंड १५ ऑगस्ट १९४७ च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरण्यात आला होता.
त्यानंतर हा राजदंड प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता.
आता हा राजदंड नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आला आहे.
संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.
नव्या संसद भवनाची गरज का?
जुन्या संसद भवनामध्ये काम करणे मुश्किल झाले होते. 21व्या शतकातील भारतासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा असलेली पुरेशी आसनक्षमता असलेली इमारत उभी करणे ही काळाची गरज होती.
लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर खासदारांच्या संख्येत वाढ होईल. वाढीव सदस्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागणार होती.
लोकसभेची आसानक्षमता 545 वरून 888, तर राज्यसभेची आसानक्षमता 250 वरून 384 करण्यात आली आहे.
नव्या इमारतीच्या बांधकामासाठी 60,000 कामगारांना रोजगार मिळाला होता . त्यांच्या योगदानाची माहिती देणारी डिजिटल गॅलरी उभारण्यात आली असून 11 कामगारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.
भित्तिचित्रावर अखंड भारताची संकल्पना:
इमारतीतील भित्तिचित्र, पूर्वीची महत्वाची राज्ये, शहरे आणि सध्या पाकिस्तान असलेल्या तत्कालीन तक्षशिलातील प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवते.
75 रुपयांच्या नाण्याचे विशेष अनावरण:
नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभातच पंतप्रधानांच्या हस्ते 75 रुपयांच्या नव्या नाण्याचे अनावरण करण्यात आले.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या नव्या नाण्याचे वजन 34.65 ते 35.35 ग्रॅम आहे.
या नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचा सिंह आहे तर डावीकडे देवनागरी लिपीत भारत लिहिलेले आहे. तर उजवीकडे इंडिया असे इंग्रजीत लिहिलेले आहे.
तसेच अशोक स्तंभाच्या सिंहाखाली रुपयाचे चिन्ह असून 75 असे अंकात लिहिलेले आहे.
या नाण्याचा व्यास 44 मिलिमीटर असून हे नाणे चार धातूंनी तयार केलेले आहे .
यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5%टक्के निकेल आणि 5% जस्त आहे .
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेच चित्र आहे तर वरच्या बाजूला देवनागरीत व खालच्या बाजूला इंग्रजीत संसद संकुल असे लिहिलेले आहे .याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला 2023 हे वर्ष छापले आहे.
भारत आणि जगातील संसद भवनाचा इतिहास:
सन 1927 मध्ये भारताच्या विद्यमान संसद भवनचे उद्घाटन लॉर्ड आयर्विन यांनी केले होते. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी केवळ 83 लाख रुपये खर्च झाले.
सध्याच्या भारतीय संसदेच्या सभागृहाला 100 वर्षेही पूर्ण झाली नाहीत. जगात असे अनेक देश अस्तित्वात आहेत, जिथे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले संसद भवन अजूनही देशातील खासदारांचे केंद्र आहे.
जगातील सर्वात जुनी संसद इमारत (द बिन्नेनहॉफ) नेदरलँड्सची आहे. ते 13 व्या शतकात बांधले गेले. येथे आजही खासदारांच्या बैठका होतात.
याशिवाय इटलीचे संसद भवन (पालाझो मॅडमा) देखील खूप जुने आहे. येथे संसदेची स्थापना 1505 मध्ये झाली.
फ्रान्सचे संसद भवन (लक्समबर्ग पॅलेस) देखील जुने आहे. ही इमारत तेथील राजा निवास म्हणून 1615 ते 1645 दरम्यान बांधली गेली. 1958 पासून येथे संसद भवनाची बैठक घेण्यात येत आहे.
याशिवाय अमेरिकेचे संसद भवनही 200 वर्षांहून अधिक जुने आहे. अमेरिकेची संसद सन 1800 मध्ये बांधली गेली.
त्याचबरोबर ब्रिटनचे संसद भवनही खूप जुने आहे. येथील हाऊस ऑफ कॉमन 1840 मध्ये बांधले गेले होते आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स 1870 मध्ये बांधले गेले होते