Current Affairs
नशामुक्त भारत पंधरवडा एनसीबी कडून जाहीर (Drug free India fortnight announced by NCB)
- 12/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
केंद्र सरकारने अमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे . त्याचे पालन करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) 12 ते 26 जून या दरम्यान नशा मुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे.
अमली पदार्थाच्या दुष्परिणामबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या पंधरवड्यात करावया महत्त्वाच्या बाबी:
अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नशा मुक्त भारत पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
26 जून या जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद ,कार्यशाळा ई- प्रतिज्ञा मोहिमा याद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत.
कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे.
नशा मुक्त भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडियासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करावा.