Current Affairs
नागौर जिल्ह्यात सापडला लिथियमचा सर्वात मोठा साठा
- 09/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
इलेक्ट्रिक बॅटरी तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या लिथियम या धातूचा साठा राजस्थानातील नागौर जिल्ह्यात आढळला. राजस्थान सरकार आणि भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
नागौर जिल्ह्यातील डेगाना येथे हा साठा आढळला .
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर मध्ये आढळलेल्या लिथियम च्या साठ्यापेक्षा राजस्थानातील साठे मोठे असल्याचे सांगण्यात येते.
लिथियमचा वापर:
स्मार्टफोन, लॅपटॉप, लेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये लिथियमचा वापर होतो.
लिथियम जगातील सर्वात हलक्या वजनाचा धातू आहे. त्याच्या मदतीने रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विजेमध्ये होते आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांमधील हा महत्त्वाचा घटक आहे.
उत्पादनाचे महत्व:
इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांच्या वाढत्या वापरामुळे लिथियम साठे असणाऱ्या देशांनाही महत्व आले आहे.
जगातील सर्वाधिक 47 % लिथियम ऑस्ट्रेलियात सापडते. चिलीमध्ये 30%, तर चीनमध्ये 15% साठे आहेत.
लिथियमवरील प्रक्रियेपैकी 58% प्रक्रिया चीनमध्ये होते, 29 % चिलीमध्ये तर 10% अर्जेंटिनामध्ये होते.
भारतात चिनमधून लिथियमचे आयात:
भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चिनमधून लिथियमची आयात होते.
भारताने 2020 ते 2021 या काळात 6 हजार कोटी रुपयांच्या लिथियमची आयात केली. त्यापैकी 3 हजार 500 कोटी रुपयांचे लिथियम(जवळपस 53.76%) चीनमधून आयात करण्यात आले होते.