Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > ना. धों. महानोर यांचे निधन | Na. Dho. Mahanor passed away
ना. धों. महानोर यांचे निधन | Na. Dho. Mahanor passed away
- 04/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● मराठी साहित्य रसिकांना रान कवितांची भुरळ पाडणारे आणि निसर्गाशी एकरूप झालेले जेष्ठ कवी नामदेव धोंडो महानोर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
अल्पचरित्र:-
● संपूर्ण नाव : नामदेव धोंडो महानोर
● जन्म :-16 सप्टेंबर 1942
● गाव:- पळसखेड
● तालुका:- सोयगाव
● जिल्हा:- छत्रपती संभाजीनगर
● शिक्षण:- जळगाव येथे पदवी प्रथम वर्ष
● व्यवसाय:- शेती
● आमदार:- विधान परिषदेवर बारा वर्षे सदस्य ( 1978 पासून)
● दादा आणि रानकवी या नावाने त्यांना ओळखले जात.
कवितासंग्रह:-
● रानातल्या कविता
● पावसाळी कविता
● पळसखेडची गाणी
● पक्ष्यांचे लक्ष थवे
● प्रार्थना दयाघना
● पानझड
● गाथा शिवरायांची
● तिची कहाणी
● जगाला प्रेम अर्पावे
● गंगा वाहू दे निर्मळ
● वाहटूळ
कथा, कादंबरी:-
● गांधारी
● गावातल्या गोष्टी
● यशवंतराव चव्हाण आणि मी
● पु .ल .देशपांडे आणि मी
● शरद पवार आणि मी
● कैसे कळवळ्याची जाती
● त्या आठवणींच्या झोका
● गपसप
● रानगंधाचे गारुड
● गाव गारुड
● कवितेतून गाण्याकडे
● रानगंध
शेती, पाणी, पर्यावरणवरील लिखाण:
● शेतकरी दिंडी
● शेतीसाठी पाणी
● सिताफळ बागेची गोष्ट
● दिवेलागन
● शेती आत्मनाश व नव संजीवन
● या शेताने लळा लाविला
● विधिमंडळातून
गाजलेली गाणी:-
● जांभुळ पिकल्या झाडाखाली (जैत रे जैत)
● मी रात टाकली मी कात टाकली (जैत रे जैत)
● भरलं आभाळ पावसाळी(एक होता विदूषक),
● नभ उतरू आलं, चिंब थरथर ओल (जैत रे जैत),
● चिंब पावसानं रानं झालं आबादानी (सर्जा)
● मन चिंब पावसाळी ,झाडांत रंग ओले (अजिंठा)
● भुई भेगाळली खोल, वल राहिली ना कुठ( दोघी)
● दूरच्या रानात, केळीच्या बनात (अल्बम)
सांस्कृतिक क्षेत्रातील नियुक्ती:
● विधान परिषद आमदार
● महाराष्ट्र शासन चित्रपट नाट्य व सांस्कृतिक कार्य सदस्य
● साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य, दिल्ली सदस्य (गुजरात, मध्य प्रदेश राजस्थान, महाराष्ट्र)
● विश्वकोश मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य
● साहित्य अकादमी दिल्ली सदस्य
● सरदार सरोवर ,नर्मदा
महत्त्वाचे पुरस्कार :-
● भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (1991)
● पानझड कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (2000)
● विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (2012),
● कृषी कृषिभूषण पुरस्कार (1985),
● कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (2009 )
● महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार,
● मराठवाडा भूषण पुरस्कार ,
● अनंत भालेराव स्मृती पुरस्कार
इतर सन्मान:
● मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष,
● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
● नागपूर येथील पहिल्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष
● पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
● औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष