ऑस्ट्रेलियाचे माजी टेनिसपटू ओव्हन डेव्हिडसन यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले.
आंतरराष्ट्रीय टेनिस ‘हॉल ऑफ फेम’ने डेव्हीडसन यांचे निधन झाल्याची घोषणा केली.
डेव्हिडसन यांनी टेनिस कारकीर्दीत 13 दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली होती यात मिश्र दुहेरीतील 11 आणि पुरुष दुहेरीतील दोन विजेतेपदांचा समावेश होता.
डेव्हीडसन यांनी दिग्गज टेनिसपटू बिली जिन किंग यांच्यासोबत खेळताना 8 ग्रँड स्लॅम जेते पद पटकावली होती .
1967 मध्ये डेव्हिडसन यांनी मिश्र दुहेरी गटात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या.
एका वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे ते केवळ तिसरे टेनिसपटू ठरले होते.
Δ