Current Affairs
नीरज चोप्राचे ऐतिहासिक सुवर्णयश | Neeraj Chopra’s historic golden achievement
- 29/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपट्टू नीरज चोप्राने आणखीन एक इतिहास रचला आहे
हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले.
पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात निरजने सर्वोत्तम कामगिरी केली.
17 मीटर भालाफेकत सुवर्णपदक पटकावले.
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आणि आशियाई खेळाडू ठरला.
पाकिस्तानचा नदीम दुसऱ्या स्थानी (87.82 मी.) तर चेक प्रजासत्ताकचा जेकब वाडलेजला हा (86.67 मीटर) तिसऱ्या स्थानी
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे तिसरे पदक:
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे हे एकूण तिसरे पदक ठरले.
यापूर्वी 2022 मध्ये जागतिक स्पर्धेत नीरजने रौप्य पदक मिळवले होते तर त्याआधी 2003 यावर्षी महिलांच्या लांब उडीत अंजू बॉबी जॉर्जने कांस्यपदक मिळवले होते
नीरजची महत्त्वाच्या स्पर्धेतील कामगिरी:-
- आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा : रौप्य पदक (2016)
- जागतिक कनिष्ठ अजिंक्य स्पर्धा: सुवर्णपदक (2016)
- दक्षिण आशियाई स्पर्धा : सुवर्णपदक (2016)
- आशियाई अजिंक्यपद स्पर्धा: सुवर्णपदक (2017 )
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सुवर्णपदक (2018)
- आशिया क्रीडा स्पर्धा :सुवर्णपदक (2018)
- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा : सुवर्णपदक (2021)
- जागतिक अथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा:रौप्य पदक(2022)
- जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा : सुवर्णपदक (2023)