अशिया क्रीडा स्पर्धेचा पाचवा दिवस नेमबाजांचा राहिला.
भारतीय नेमबाजाने एका मागून एक पदकांचा वेध घेत एकाच दिवशी दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली .
युवा नेमबाज सिफ्त कौर सामराने महिलांचे 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्णपदकांची कमाई केली.
या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी सिफ्त पहिली भारतीय ठरली.
दुसरे सुवर्ण महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात मिळाले.
मनू भाकर, इशा सिंग आणि रिदम सागवान या महिला त्रिकूटाने भारताला 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले.
आतापर्यंत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यावर्षी 5 सुवर्ण 7 रौप्य आणि 10 कांस्यपदकासह एकूण 22 पदके पटकावले आहेत. (27 सप्टेंबर पर्यंत…)
Δ