Current Affairs
नोबेल पारितोषिक विजेते हॅरी मार्कोविट्झ यांचे निधन | Nobel Prize Winner Harry Markowitz Passes Away
- 01/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
गुंतवणुकीसाठी संशोधन आणि विश्लेषणासाठी विशेषतः गुंतवणूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी संख्याशास्त्राचा प्रथम वापर करणारे हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांचे अमेरिकेत सॅन दिएगो येथे 22 जून रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
पुर्वनिश्चित परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधावा लागतो आणि हे निश्चित करण्यासाठी संख्याशास्त्रातील संकल्पना वापरता येतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.
गुंतवणूक जगतात वापरण्यात येणारी कंपन्यांची विश्लेषण पद्धत बेंजामिन ग्रॅहम यांनी 1930 यावर्षी विकसित केली पण अशा उत्तम कंपन्यांचा पोर्टफोलिओ बांधण्याची आणि त्याचे कार्यक्षमता मोजण्याची पद्धत हॅरी यांनी मांडली.
हीच मॉडर्न पोर्टफोलिओथेरीची सुरुवात होती.
हॅरी मार्कोविट्झ यांनी त्यांच्या ‘पोर्टफोलिओ सिलेक्शन’ या शोधनिबंधात हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.
जनरल ऑफ फायनान्स मध्ये 1952 या वर्षी प्रकाशित झालेल्या या सिद्धांतासाठी त्यांना 1990 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.