Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > Current Affairs > International > नोबेल पारितोषिक 2022
नोबेल पारितोषिक 2022
- 13/03/2023
- Posted by: Editorial Team
- Category: Current Affairs International
No Comments
सन 2022 या वर्षीच्या नोबेल पारितोषिकांचा 10 डिसेंबर 2022 पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनी, स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 10 डिसेंबर (1833) रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाते. फक्त शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण त्याच दिवशी नोर्वेतिल ऑस्लो येथे केले जाते. प्रत्येक विजेत्याला 10,00,000 स्वीडिश क्रोन एवढी रक्कम मिळते. 1901 वर्षी पहिला नोबेल पुरस्कार वितरित करण्यात आला. आज पर्यन्त 989 व्यक्ति आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. या मध्ये 954 व्यक्ति तर 27 संस्था आहेत. (काही व्यक्तींना एकापेक्षा जास्त वेळा पुरस्कार देण्यात आला).
नोबेल पारितोषिक 2022
विषय | पुरस्कार प्राप्त व्यक्ती | संशोधन |
---|---|---|
भौतिकशास्त्र | अॅलेन अॅस्पेक्ट (Alain Aspect - FRANCE), जॉन एफ क्लॉझर (John F. Clauser - AMERICA) अँटोन झेलिंगर (Anton Zeilinger - AUSTRALIA) | क्वांटम माहिती विज्ञान आणि फोटॉनवर केलेल्या संशोधनबद्दल ज्यामुळे संगणक व क्रिप्टोग्राफीमधील अनुप्रयोगांची पायाभरणी झाली यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. |
रसायनशास्त्र | कॅरोलिन आर. बर्टोझी(Carolyn Bertozzi - AMERICA), मॉर्टन मेल्डल (Morten Meldal- DENMARK) के. बॅरी शार्पलेस (Barry Sharpless- AMERICA) | “क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी” हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. |
शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र (Physiology or Medicine ) | स्वांते पाबो (Svante Pääbo – Sweden ) | मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकते बाबत केलेल्या अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे |
साहित्य | फ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स (Annie Ernaux) | “व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती” यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे |
शांतता | बेलारूस येथील मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिलियात्स्की, रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज | शांतता पुरस्कार विजेते त्यांच्या देशांतील नागरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. |
अर्थशास्त्र | एस. बर्नान्के (Ben S. Bernanke) डग्लस डब्ल्यू. डायमंड (Douglas W. Diamond) फिलिप एच. डायबविग (Philip H. Dybvig) | "बँका आणि आर्थिक संकटांवरील संशोधनासाठी" यांना संयुक्तपणे सन्मानित करण्यात आले आहे. |