Current Affairs
नौदलाकडून ब्राह्मोसची यशस्वी चाचणी
- 16/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information

नौदलाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
नौदलाचे अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका आयएनएस मोरगाव वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले .
या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेचे प्रदर्शन केले.
या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोस ची पहिली चाचणी यशस्वी झाली.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र:
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची ‘एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया’ संस्था, या दोघांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते.
ही क्षेपणास्त्रे पाणबुडी , युद्धनौका, विमाने किंवा जमिनीवरून प्रेक्षेपित करता येतात
ब्राह्मोस ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने उडते.
भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे.जानेवारी 2022 मध्ये भारताने क्षेपणास्त्रच्या तीन बॅटरी पुरविण्यासाठी फिलिपीन्स सोबत 37 कोटी पाच लाखांचा करार केला होता
पार्श्वभूमी:
भारताची ब्रम्हपुत्रा नदी व रशियाची मोक्सवा नदी यांच्या नावाववरून या क्षेपणास्त्राचे नामकरण करण्यात आले आहे.
भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या ‘पी-७०० ग्रानित’ या क्षेपणास्त्रावर आधारलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणून विकसित करायचे होते. मात्र रशियाने “क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करारास” बांधील असल्याने हे क्षेपणास्त्र पी-८०० ओनिक्स या निम्न पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर आधारून विकसित करण्यात आले.
या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन ब्राह्मोस कॉर्पोरेशनेने विकसित केले आहे.