Current Affairs
पक्ष्यांच्या संख्येत भारत जगात दुसरा
- 25/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जागतिक पातळीवर ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणनेत भारतात तब्बल 1,072 प्रजातींच्या जवळपास 53, 750 पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
वरील आकडेवारीसह पक्ष्यांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात 7,622 पक्ष्यांची नोंद.
देशात ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणना 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आली त्यात सुमारे 4,259 पक्षी निरीक्षकांनी 1 हजार 72 प्रजातींच्या जवळपास 53 हजार 750 पक्ष्यांची नोंद केली आहे.
देशात तामिळनाडू आघाडीवर
या गणनेत देशात तामिळनाडू 12,174 पक्षांच्या नोंदणीसह प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर केरळ (8,927 ) आणि महाराष्ट्रात (7,622) अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो.
ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणनेचीची वैशिष्ट्ये:
सर्वाधिक पक्षांची नोंद झालेल्या देशात भारत दुसऱ्या क्रमांकावर
पक्षांच्या सर्वाधिक प्रजाती आढळलेल्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर
यावर्षी पोपट हा पक्षी सर्वाधिक आढळला
सर्वाधिक पक्ष्यांची नोंद झालेले देश:
1) अमेरिका (1, 96 , 556 )
2)भारत (53, 750)
3) कॅनडा( 27, 475 )
4)ऑस्ट्रेलिया (4,524 )
5)स्पेन (4,128)