Current Affairs
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा(एनएमपी) कार्यक्रमाने पटकावला 2022 या वर्षासाठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेचा पंतप्रधान पुरस्कार
- 22/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा(एनएमपी) या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेचा ‘इनोव्हेशन- सेंट्रल’ या श्रेणीत 2022 या वर्षासाठीचा पुरस्कार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाला(DPIIT) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या नागरी सेवा दिवस सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला.
आतापर्यंत पीएम गतिशक्ती एनएमपीमध्ये 1450+ डेटा लेयर्स असून त्यामध्ये केंद्रीय मंत्रालयाचे 585, राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे 870+, पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र मंत्रालये/ विभाग यांच्यासह केंद्रीय मंत्रालये/ विभाग आणि सर्व 36 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांचे 30+ लेयर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्व मंत्रालये/ विभाग आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेश याचा वापर करत आहेत आणि त्यांना पीएम गतिशक्ती एनएमपीचा वेळ आणि खर्चाची बचत, सुयोग्य नियोजन, जलद मंजुरी, किफायतशीर अंमलबजावणी, प्रकल्प प्रलंबित राहण्याच्या वेळेत घट, आंतर मंत्रालयीन समन्वयात सुलभता या सर्व निकषांनुसार फायदा झाला आहे.