Current Affairs
पेंच व्याघ्र प्रकल्पाचा भोपाळच्या वनव्यवस्थापन संस्थेशी करार | Pench Tiger project in agreement with Bhopal Forest Management Institute
- 29/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील आधुनिक पद्धतीतील संशोधनासाठी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्था यांच्यात करार करण्यात आला.
वन्यजीव संवर्धनासाठी असणारा प्राधान्यक्रम आणि रचना संवर्धन उपायांची यशस्वीपणे माहिती देण्यासाठी वन्यजीव प्रजातींचे जीवशास्त्र समजून घेणे, जैवविविधतेच्या नुकसानाच्या परिणामाचे मूल्यांकन करणे आणि प्रजातींच्या समुदायांमधील बदलांची निरीक्षण करणे आवश्यक आहे.
त्यामुळेच विज्ञानावर आधारित संवर्धन पद्धतीबाबत जाणून घेण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाने भोपाळ येथील भारतीय वनव्यवस्थापन संस्थेची सामंजस्य करार केला आहे.
वन्यजीव क्षेत्रात केवळ अल्पकालीनच नाही तर दीर्घकालीन संशोधनाची उद्दिष्ट आहे या कराराअंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी तात्काळ चिंतेचा विषय असलेल्या विषयांना प्राधान्य देण्यात येईल.