Current Affairs
प्रशांत दामले यांना भावे गौरव पदक |Bhave Gaurav Medal to Prashant Damle
- 18/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर झाले.
गौरव पदक रोख, 25 हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाट्य विद्य मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी प्रशांत दामले यांच्या नावाची घोषणा केली.
नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मराठी चित्रपट ,दूरदर्शन, नाट्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा पुरस्कार दिले असल्याचे सांगण्यात आले.
मागील 40 वर्षात प्रशांत दामले यांनी 12,500 पेक्षा अधिक नाट्य प्रयोग केले आहेत आज अखेर 37 मराठी चित्रपट 24 दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
यावर्षीचा हा 56 वा पुरस्कार असून 5 नोव्हेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
दरवर्षी रंगभूमी नाट्य संमेलन अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जातो.